Share

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विराट-अनुष्काने सुरु केले कॅम्पेन ; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा
स्थगित करण्यात आली आहे.

आयपीएलची स्पर्धा स्थगित झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या घरी परतला आहे. महत्वाचे म्हणजे, घरी परतल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराट कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.

नुकताच विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये अनुष्का आणि विराट दोघेजण दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे अनुष्का आणि विराट म्हणाले, ‘कोविड १९चा उद्रेक झाल्यापासून आपला देश कठीण काळातून जात आहे. आपल्या आरोग्य व्यवस्थांना आव्हान दिले जात आहे. आपल्याला एकत्र येऊन आपल्या भारताला मदत करण्याची गरज आहे.

कोविड १९ रिलीफ मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी अनुष्काने आणि मी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू केली आहे. आणि आम्ही तुमच्या समर्थनाबद्दल आभारी आहोत. जीव वाचवण्यासाठी कोणतीही रक्कम फारच कमी नाही. परंतु या संघर्षासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. मी तुम्हा सर्वांना आमच्या चळवळीत सहभागी होण्याची विनंती करतो. चला आपला देश सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी आपली भूमिका करू.धन्यवाद.’ असे म्हणत विराट आणि अनुष्काने या कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे सर्वाना आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!