नंदुरबार : खासदार डॉ.हीना गावित या त्यांच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर मोदी लाटेमुळे निवडून आल्या आहेत. गावित स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा विसरल्या आहे. आदिवासी विभागात झालेल्या ६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी पदाचा राजीनामा देतील पण भाजपच्या सर्व ११ नगरसेवकांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित यांना दिले.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, माझ्या मुलीला डॉक्टर करण्यासाठी दरवर्षी १७ लाख रुपयांप्रमाणे तीन वर्षांत शासनाला ५१ लाख रुपये भरले आहेत. पण हीना गावित यांच्या शिक्षणाची फी राज्य शासनाने भरली आहे. मिशन शाळेत शिकत असताना डॉ. हीना गावित यांना किती गुण मिळत होते?, किती वेळा त्या मेरीटमध्ये आल्या होत्या हे मला माहिती आहे, त्यावर बोलायचे नाही. केवळ नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांना अपात्र केले जात नाही तसेच माझे फार्म हाऊस तोडले जात नाही म्हणून खासदार डॉ. हीना गावित या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विरोधात बोलत आहेत.
डॉक्टर झाल्यानंतरही जर लाेकांच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग होणार नसेल तर काय कामाचे ते शिक्षण? सेवा करण्यासाठी राज्य शासनाची कुठलीही परवानगी लागत नाही. टीका झाल्यानंतर खासदार डॉ. हीना गावित या कोविड सेंटरची पाहणी करत आहे. कशाला पाहणी करतात. जे अधिकारी काम करत आहे त्यांना त्यांचे काम करू द्या. उगीच काम करत असल्याचा देखावा करू नका, असा सल्ला चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला.
पंतप्रधान मोदींच्या नावावर निवडून आलेल्या ताई आता स्वत:च्या कामाने निवडून आल्याचे सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी भाजपला मतदान केले. त्यात खासदार डॉ. हीना गावित यांच्या कर्तृत्वाचा संबंध येतो कुठे? असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘भुजबळांना धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा’
- ‘चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊंच्या कामाचे श्रेय घेऊ नये’, रोहिणी खडसेंचा टोला
- इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली कृषी सहायकाला ३३ लाखांचा गंडा
- ‘स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्रावर टीका’
- आता फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना डिजिटल कर भरावा लागणार


