🕒 1 min read
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरक्षण रद्द होण्याचं खापर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांनी देखील राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अनपेक्षित आणि दुर्दैवी म्हणावा लागेल. राज्य सरकारने ही बाब गंभीरपणे घेतली नाही, सरकारमधील तीनही पक्षांमध्ये समन्वय नाही. राज्य सरकारची उदासिनता आणि अनास्था यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाले आहे. तमाम मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध..’ अशा शब्दांत धनंजय महाडिक यांनी संताप व्यक्त केला आहे.
तमाम मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध..#मराठाआरक्षणरद्द
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) May 5, 2021
याची जबर किंमत मोजावी लागेल – समरजितसिंह घाटगे
महाविकास आघाडी सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याची जबर किंमत महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागेल, असा इशारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली कृषी सहायकाला ३३ लाखांचा गंडा
- ‘स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्रावर टीका’
- आता फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना डिजिटल कर भरावा लागणार
- ‘निलंग्यातील तहसीलदारांना निलंबित करा’, कोरोना मृत्यूवरून सर्वपक्षीय नेते आक्रमक
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

