अहमदनगर : महाराष्ट्राला केंद्राने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर टीका करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्राकडून राज्य सरकारवर अन्याय होत असल्याचा आरोप होतोय. यावर ते म्हणाले, केंद्राकडून १,७५० मॅट्रिक टन ऑक्सिजन साठा मिळत आहे, तसेच ४ लाख ३५ हजार रेमडेसेवीर मिळत आहे. परंतु राज्य सरकार राज्यातील यंत्रणा सक्षम करण्यात कमी पडले आहे. कारण राज्याला मदत करणे ही केंद्राची जबाबदारी व कर्तव्य आहे. राज्याला माल उपलब्ध करण्यासाठी केंद्राशी समन्वय राज्य सरकारने साधला पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.
दरम्यान, नातेवाईकांना रेमडेसिवीर आणायला सांगू नका, रुग्णालयाने साठा दिलेला आहे. नातेवाईकांना सूचना दिले असताना, रुग्णालयातील रेमडेसेवीर जाते कुठे ? त्याचा काळाबाजार होतोच कसा? असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. यापुढे असे होता कामा नये, अशी ताकीदही दरेकर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- आता फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना डिजिटल कर भरावा लागणार
- ‘निलंग्यातील तहसीलदारांना निलंबित करा’, कोरोना मृत्यूवरून सर्वपक्षीय नेते आक्रमक
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा
- पालकांना दिलासा! शाळांनी फीमध्ये १५ टक्के कपात करावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

