Share

बीडच्या पाडळी येथे लोकसहभागातून विलगीकरण केंद्र सुरु

Published On: 

बीड: शहरात ज्या वीगाने कोरोनाचा प्रसार होत आहे तसाच प्रसार ग्रामीण भागात देखील बघायला मिळत आहे. गावातून शहरात जायला रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शहरात जाऊन देखील रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही अशा परिस्थितीत रुग्ण आणि त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक यांची मानसिक स्थिती काय होत असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. या अडचणी लक्षात घेऊन पाडळी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पाडळी परिसरातच विलगीकरण केंद्र सुरु केले आहे.गावात वाढत जाणारी रूग्णसंख्या तसेच गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांमुळे होणारा कोरोनाचा प्रसार पाहता शिरूर तालुक्यातील पाडळी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत ५० बेडचे विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. पंचायत समिती सभापती उषा सरवदे, गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी या केंद्राचे उद‌्घाटन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत गावात ४० हून अधिक कोविड रूग्ण आहेत. सुविधांअभावी जे रूग्ण गृह विलगीकरणात राहिलेले आहेत, त्यांच्याकडून योग्य पध्दतीने काळजी न घेतली गेल्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. ही बाब शिक्षक सुभाष कंठाळे यांनी गावातील समाजसेवक माऊली सिरसट यांच्याकडे मांडली. सिरसट यांनी सरपंच रामदास हांगे यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा करत विलगीकरण केंद्र सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. त्यानुसार माजी सरपंच संतोष कंठाळे यांच्या सहकार्यातून आदर्श शिक्षण संस्थेच्या पाडळी येथील पाडळी हायस्कूलची इमारत विलगीकरण कक्षासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

शाळेची इमारत अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांनी हाती खराटे घेत सर्व परिसर स्वच्छ करून घेतला. त्यानंतर याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. यासह बेड व इतर आवश्यक सुविधांची उपलब्धता करण्यात आली. पंचायत समिती सभापती उषा सरवदे व गटविकास अधिकारी चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी अशोक गवळी यांनीही या केंद्राला भेट देऊन आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!