Share

‘रोहित सरदाना खोटारडा होता, तो आठवणीत राहणार नाही’, शरजील उस्मानीचे वादग्रस्त ट्विट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आज तक या वृत्त वाहिनीचे अँकर आणि पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. कोणाचेही निधन झाल्याची बातमी कळताच, प्रत्येकाच्या मनात हळहळ व्यक्त होतेच. पण रोहित सरदाना यांच्या मृत्यूनंतर नेहमीच वादात असलेल्या शरजील उस्मानीने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले आहे.

देशातील प्रसिद्ध अशा वृत्त वाहिनीत रोहित सरदाना काम करत होते. देशातील अनेक नामवंत नेते मंडळींची मुलाखत त्यांनी घेतली होती. रोहित सरदाना यांच्या विषयी सोशल मीडियावर प्रतिक्रीया देताना शरजील म्हणतो की, ‘समाजविरोधी, मनोरुग्ण खोटारडा, नसंहाराचे समर्थन करणारा होता. तो पत्रकार म्हणून आठवणीत राहणार नाही.’

रोहित सरदाना यांनी या आधी ‘झी न्यूज’ मध्येही काम केले होते. ते ‘झी’ मधून ‘आज तक’मध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. देशातील मोजक्या पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारीता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!