🕒 1 min read
दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रोगाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही भयानक असून देशात विक्रमी रुग्णांची नोंद केली जात आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, आवश्यक औषधे यांचा गंभीर तुटवडा झाल्यामुळे रुग्ण अक्षरशः तडफडून प्राण सोड आहेत. यामुळे रुग्णांचे नातेवाईक वा मित्र परिवार मदतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहेत.
यासोबतच, आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करून अनेक जण सोशल मीडियाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी पोस्ट करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असा महत्त्वाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. देशातील कोणतंही राज्य सरकार नागरिकांकडून सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या माहितीवर, सोई-सुविधांच्या तक्रारीवर कारवाई करणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
या निर्देशाकडे दुर्लक्ष करून ‘सरकारविरोधात अफवा’ पसरवण्याच्या नावाखाली नागरिकांवर कारवाई केली तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अवमाननेचं प्रकरण दाखल करण्याची तंबी देखील सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व सर्व राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना हा आदेश देताना दिली आहे. दिली आहे. विविध राज्यांमध्ये कोरोनामुळे स्थिती आटोक्याबाहेर जात असून आरोग्य व्यवस्था पूर्ती कोलमडली आहे.
दरम्यान, रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, औषधे अशा आवश्यक गोष्टींची उपलब्धता करून देण्यास राज्य सरकार व केंद्र सरकार अपयशी ठरत असल्यावरून देखील न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आवश्यक सुविधा पुरवण्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदविली आहे. कोरोना काळातील विविध याचिकांवर घेण्यात आलेल्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकप्रिय पत्रकार रोहित सरदाना याचं निधन, कोरोना उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका
- कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा; १०२ वर्षीय कोरोनामुक्त आजींचा मोलाचा सल्ला
- मुख्यमंत्री उद्धवजी सांगा गरिबांनी जगायचं कस?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?
- सामना सुरु असताना कार्तिक भीडला धवनला, ‘गब्बर’नेही दिले असे उत्तर; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
