🕒 1 min read
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रोगाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही भयानक असून देशात विक्रमी रुग्णांची नोंद केली जात आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, आवश्यक औषधे यांचा गंभीर तुटवडा झाल्यामुळे रुग्ण अक्षरशः तडफडून प्राण सोड आहेत. मात्र, अशा स्थितीतही काही दिलासादायक वृत्त समोर येत आहे.
यंदाच्या लाटेत प्रौढ वर्गातील व्यक्तींमध्ये अधिक संसर्ग आढळून येत असून कुटुंबांचा आधारच जात असल्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. दरम्यान, यामुळे सामन्यांमध्ये भीती वाढत असतानाच एक सकारात्मक घटना समोर येत आहे. शंभरी पार केलेले वृद्ध देखील कोरोनावर यशस्वीपणे मात करत असल्याचं दिसून येत आहे.
‘कोरोनाला घाबरु नका, कोरोनाशी दोन हात करा. तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल,’ असा आत्मबल वाढवणारा सल्ला कोरोनावर मात करणाऱ्या १०२ वर्षीय आजींनी दिला आहे. ‘जर तुम्ही कोरोनाला घाबरलात. तर तुमच्यावर कोणत्याही उपचारांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोरोनाला घाबरु नका. त्याच्याशी दोन हात करा. तुम्ही नक्की त्यातून बरे व्हाल’ असा संदेश मुंबईतील अंधेरीत राहणाऱ्या सुशीला पाठक या 102 वर्षांच्या आजींनी दिला आहे.
सुशीला पाठक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शंभरी पार केल्यानंतर त्या उपचाराला कसा प्रतिसाद देतील ? असा प्रश्न कुटुंबियांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, या आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपर्डेकर आणि डॉक्टर अभिजीत बोपर्डेकर यांना आपल्या आजीची इच्छा शकतो माहिती होती. त्यांनी आजींवर उपचार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवळपास १५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आजीनी कोरोनावर मात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकप्रिय पत्रकार रोहित सरदाना याचं निधन, कोरोना उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका
- टी-२० विश्वचषक कुठेही झाला तरी यजमानपद हे बीसीसीआयच्याच हाती
- विनाकारण फिरणारांनो सावधान ! लाॅकडाऊनची नांदेडमध्ये कडक अंमलबजावणी सुरु
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
