जालना: सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे तसेच जालना शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह आता मृतांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अंत्यसंस्कारासाठी आता स्मशानभूमीचे ओटे कमी पडू लागले आहे. त्यामुळे जागा मिळेल तेथे अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडावे लागत आहे. मुक्तीधाम स्मशानभूमीत पहिल्या शेड उभारणीचे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे. नगर पालिकेने आणखी एका शेडसह स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची टाकी आणि सुरक्षारक्षक खोली तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.
शहरासह जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. एकाच वेळी २० ते २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येईल, असा विचारही मनाला कधी शिवला नव्हता. संसर्ग पसरू नये म्हणून कोरोनामुळे मृत झालेले पार्थिव रूग्णालयातून थेट स्मशानभूमीत नेले जाते. तेथे नगर पालिकेचे कर्मचारी पीपीई कीट घालून मृतांवर अंत्यसंस्कार करतात. मागच्यावर्षी मृतांची संख्या खूप कमी होती, आता चालू वर्षात फेब्रुवारीपासून बाधित रूग्णांसह दररोज मयत सहा ते सात अशी संख्या असताना हळु हळु त्यात वाढ होवून १२ ते १५ नंतर १६ ते १७ आणि आता थेट २२ ते २५ अशी झाली आहे. त्यामुळे नगर पालिकेने गांधीनगर भागात मयत कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी केलेली व्यवस्थाही आता तोकडी पडू लागली आहे.
दरम्यान, आ. कैलास गोरंटयाल यांनी स्वत: १५ टन कृत्रिम लाकूड देवून शहरातील दानशुरांनाही आवाहन केले होते. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मृतांच्या वाढत्या संख्येमुळे अंत्यविधी करायचा कुठे असा प्रश्न सध्या निर्माण झाल्याने नगर पालिकेने मुक्तीधाम परीसरात एका वेळी दहा जणांवर अंत्यसंस्कार होईल, असा ओटा आणि शेड तयार केला आहे. या शेडचे काम अंतीम टप्प्यात आले असून पुढचे नियोजन म्हणून नगर पालिकेने या स्मशानभूमीत आणखी एका शेडसह सुरक्षारक्षकासाठी खोली, पाण्याची टाकी व इतर विकास कामांचा प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे मुख्याधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- राजस्थान विरुद्धच्या सामन्यात इशानला संघाबाहेर केल्याने ब्रायन लारा नाराज
- महिला सरपंचांच्या पतीने घेतली २० हजारांची लाच; एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहाथ
- पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेट बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- थोरात देणार एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, राज्यातील इतर आमदार अनुकरण करणार का ?
- अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
