Share

‘१ मे नंतर लस मिळाली नाही तर आरोग्यमंत्री राजीनामा देतील का?’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत आहे.

आवश्यक लस उपलब्ध नसल्याने सर्वच राज्यांनी लसीकरणास असमर्थता दर्शविली आहे. जर १ मे रोजी लसीकरण केंद्रांवर लस मिळाली नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन राजीनामा देणार का? असे आव्हान काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम दिले आहे. पी. चिदंबरम यांनी ट्विट करून हर्ष वर्धन यांना लक्ष्य केले आहे.

‘१ मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल. जर लस मिळाली नाही तर लसीकरण केंद्रांवरील लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? कोणतंही राज्य १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नाही. इतकंच नाही तर CoWin ॲपही सहकार्य करत नाही.’ असे ट्वीट करून त्यांनी टीकास्त्र डागलेले आहे.

दरम्यान, देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. कोरोना साथीची सद्यस्थिती पाहता पंतप्रधान मोदी काही मोठ्या घोषणा करु शकतात असे म्हटलं जातंय. पंतप्रधान कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी सर्वंकष रणनीती राबविण्याची घोषणा करू शकतात. गेल्या एका दिवसात देशात ३ ,७९ ,२५७ कोरोना केसेस नोंदवली गेली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!