दिल्ली : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघावर ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने १७२ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने ३ गडी गमावत एकोणीसाव्या षटकात पार केले. मुंबईचा सलामीवीर क्विटंन डिकॉकला ७० धावांसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सामन्याच्या पहिल्या डावात चाहरने टाकलेल्या दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर यशस्वी जयस्वालने मिड विकेटच्या दिशेने शॉट खेळला. परंतु बॅटचा कडा घेत तो चेंडू चाहरच्या हातात गेला आणि जयस्वाल झेलबाद झाला होता. यावेळी प्रेक्षागृहात राहुल चाहरची पत्नी ईशानी बसली होती. तिच्यापुढे भन्नाट विकेट घेतल्यानंतर चाहरला आनंदाश्रू अनावर झाले आणि डोळे पुसत आनंद साजरा करु लागला.
https://twitter.com/lodulalit001/status/1387723423036547076
राहुलचे चाहरचे आश्रू पाहून त्याची भावी पत्नी ईशानीही भलतीच खुश झाली होती. तिने टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राहुल चाहरने काही दिवसांपूर्वी ईशानीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहीले होते की, ‘भेटा माझ्या हेअर स्टाईलिशला.’ याद्वारे त्याने ईशानी ही त्याची होणारी पत्नी असल्याचे जगजाहीर केले होते.
महत्वाच्या बातम्या
- थोरात देणार एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, राज्यातील इतर आमदार अनुकरण करणार का ?
- पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेट बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- परप्रांतीयांविषयी राज ठाकरेंची ‘ती’ सुचना अखेर उद्धव ठाकरेंना ऐकावीच लागली
- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; ट्रक चालक फरार
- भारताला अमेरिकेचा मदतीचा हात ; मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात दाखल


