🕒 1 min read
जालना: एकीकडे राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाअवैध धंदे करणाऱ्यानी डोके वर काढले आहे. विभागीय उपआयुक्त, औरगाबाद व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली २४ एप्रिल रोजी पाचनवडगाव, लोंढेवाडी व जालना शहरात एकूण ६ गुन्हे नोंद करण्यात आली असून त्यामध्ये पाचनवडगांव येथील कुंडलिक नदीकिनारी व लोंढेवाडी शिवाराच्या नाल्याकाठी हातभट्टी निर्मिती ठिकाणी एकूण ५ गुन्हांची नोंद करुन ४७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संतकृपा हॉस्पिटल, मंठा चौफुली जालना या ठिकाणी दुचाकी क्र. एम एच २१ ए सी-२९१३ हे बेकायदेशीर देशी दारु वाहतूक करीत असताना जप्त करण्यात आले असून जालना शहर व जिल्ह्यातील अवैध दारु विक्री, निर्मिती ठिकाणीय लक्ष ठेण्यात आले आहे. अशा विविध कार्यवाईत देशी दारुच्या ४८ सीलबंद बाटल्या, गावठी हातभट्टी दारु २५ लि. रसायन १८२० लिटर जप्त करुन एका दुचाकी वाहनासह एकूण ९५ हजार ६६६ रुपयांचा मुद्देमालसह जप्त करण्यात आला आहे.
निरीक्षक एस. ए. शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंद्यांना चाप बसणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात अवैध धंदे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाला आणखी सतर्क राहून संचारबंदीच्या काळात अवैध धंद्यांना बंद पाडण्याचे आवाहन ठेऊन ठाकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला समोरं जावं, चौकशीअंती खरं-खोटं समोर येईल’
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानीचा चैञी पोर्णिमा उत्सव भाविकांविना साजरा
- आपली जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणं ही आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे – दानवे
- ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी एका नव्या पैशाचाही निधी मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला?

