पुणे – राज्यातील गरीब आणि अतीगरीब जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असून लवकरच त्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या रोज वाढते आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या एक मेपासून राज्यात 18 वर्षापर्यंत वय असणाऱ्या सर्वांना कोरोना प्रतिबंबधात्मक लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा अजित पवार यांनी शनिवारी आढावा घेतला. यानंतर बोलताना त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, ऑक्सिजनचा पुरवठा, लस उपलब्धता यावर भाष्य केले.
मोफत लसीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री १ मे रोजी भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबद्दल तेव्हाच सांगितलं जाईल असं ते म्हणाले. राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी नेमणार असून मुख्य सचिव या कमिटीचे अध्यक्ष असतील. या कमिटीत वरिष्ठ अधिकारी असतील”, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
पूनावाला म्हणाले आत्ता मी तुम्हाला इतकी लस देऊ शकणार नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू”, अस ते यावेळी म्हणाले. दरम्यान,ग्लोबल टेंडर काढायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. ही कंपनी ठरवेल की कोणती लस खरेदी करायची. रेमडेसिवीर आणि लस याबाबत ही कमिटी काम पाहिल”, असं अजित पवारांनी सांगितले आहे.
याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणासाठी जागतिक पातळीवर एक टेंडर काढण्यात येणार असल्याचे सांगितले. लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार, असे सांगत 1 मेपासून होणाऱ्या लसीकरणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. टेंडरमध्ये सर्व लस कंपन्यांचा उल्लेख केला जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.राज्यात कुणाला नवीन कोविड सेंटर उघडायचे असेल, तर आरोग्य विभागाशी बोलूनच परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून कडा या गावात वापरली ‘ही’ पद्धत
- तांदुळाचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, २३ क्विंटल तांदूळ जप्त
- …म्हणून अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा
- राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार
- ‘सर्वांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
