🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघादरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थानने केकेआरचा ६ गडी राखुन पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरने १३४ धावांचे लक्ष्य राजस्थान संघाने १९व्या षटकात ४ गडी गमावून पार केले. ४ गडी बाद करणाऱ्या ख्रिस मॉरीसला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यातील पहिल्या डावात आकराव्या षटकाच ख्रिस मॉरीस गोलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडुवर स्ट्रायकर एंडवर खेळत असलेल्या राहुल त्रिपाठीने जोरदार फटका मारला. मात्र हा चेंडु नॉन स्ट्रायकर एंडवरील मॉर्गनच्या बॅटला लागुन गोलंदाज मॉरीसकडे गेला. यादरम्यान मॉर्गन धाव घेण्यासाठी बराच पुढे गेला होता. ही संधी साधत मॉरीसने त्याला धावबाद केले. महत्वाची बाब म्हणजे मॉर्गन हा एकही चेंडु न खेळता बाद झाला होता. त्यामुळे तो डायमंड डक होणारा तिसरा कर्णधार बनला आहे.
Eoin Morgan has been run out for a diamond duck after Rahul Tripathi smashed the ball into the England captain's bat. That is as unlucky as it gets ????#IPL2021 pic.twitter.com/dTyPr3tUmG
— Wisden India (@WisdenIndia) April 24, 2021
आयपीएलमध्ये एकही चेंडू न खेळता बाद होणारा म्हणजे ‘डायमंड डक’ होणारा मॉर्गन तिसरा कर्णधार ठरला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न पहिला कर्णाधर ठरला जो डायमंड डक ठरला होता. आयपीएल २००९ स्पर्धेत वॉर्न मुंबई इंडियन्स विरुद्ध अशाप्रकारे बाद झाला होता. तसेच, आयपीएल २०१०मध्ये शेन वॉर्न पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध डायमंड डकवर बाद झाला होता. तर दुसरा डायमंड डक होणारा कर्णधार केकेआरचा गौतम गंभीर होता. गंभीर आयपीएल २०१३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध एकही चेंडू न खेळता धावबाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- केकेआरचा पराभवाचा चौकार; राजस्थान संघाचा ६ गडी राखुन विजय
- परभणी जिल्ह्यासाठी १८ केएल ऑक्सिजनचा साठा दाखल, गंभीर रुग्णांना दिलासा
- कोव्हॅक्सीनचे दरही निश्चित: राज्याला ६०० तर खासगी हॉस्पिटलला १२०० रुपयांना मिळेल लस
- पुण्याचं प्रशासन कुठल्या नशेत आहे?
- परभणी जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ८०४ रुग्ण, २२ रुग्णांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

