Share

कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष रमेश शिंदे यांचे उपचारादरम्यान कोरोनामुळे निधन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांचे शनिवारी निधन झाले. कोरोनामुळे शिंदे हे खासगी रूग्णालयात आठवडाभरापासून दाखल होते. मृत्यूसमयी ते ५४ वर्षाचे होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुद्रित शोधक म्हणून ते कार्यरत होते. अभ्यासू तसेच संघर्षशील वृत्तीमुळे महाराष्ट्रभर त्यांनी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चांगली ओळख निर्माण केली होती. रमेश शिदे हे महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने महासंघाच्या माध्यमातून प्रयत्नशील असायचे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी –  अधिकारी संघटनेचेही ते सचिव होते. विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी सकाळ या दैनिकांत नाशिक आवृत्तीला मुद्रीतशोधक तसेच उपसंपादक म्हणूनही काही वर्षे  सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक वेळा खुप मोठा संघर्ष केलेला आहे. विद्यापीठ कायदे व सर्व शासनादेश यांची अभ्यासपूर्ण मांडणी ते करत होते. राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!