Share

‘इथं पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही, पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढं केलंय का ?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले.

दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता देशमुखांना अटक करा अशी मागणी याचिकाकर्त्या ऍड. जयश्री पाटील यांनी केली आहे. अनिल देशमुखांविरोधात सबळ पुरावे सीबीआयकडे असल्याने त्यांना अटक झाली पाहिले अशी जोरदार मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे.

यासोबतच, सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर जयश्री पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर प्रहार केला आहे.  ‘मुश्रीफ यांना सांगायचंय, की येथे पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही. पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ? जे पुढे येऊन रोज बोलत आहेत. त्या सगळ्यांची नावे पुढे येणार आहेत,’ असा गंभीर इशारा जयश्री पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.

यासोबतच, ‘हाय कोर्टाच्या ऑर्डरनुसार परिच्छेद 41, 82, 83 नुसार सीबीआयला कारवाईचे आदेश आहेत. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कोर्ट ऑर्डर वाचावी. टीका करून दिशा भरकटवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा प्रसार करू नये,’ असं देखील पाटील म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!