🕒 1 min read
नागपूर : १०० कोटींच्या खंडणीचा आरोप मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी केल्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांच्या नागपूर येथील निवासस्थानात जवळपास दहा तासांहुन अधिक झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी बाहेर पडले होते. यावेळी त्यांनी महत्वाच्या कागदपत्रांसह लॅपटॉप, प्रिंटर सारखे इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील सीबीआयच्या टीम ने ताब्यात घेतले आहेत. तर, अनिल देशमुख यांची चौकशी देखील सीबीआय अधिकारी यांनी केल्याचे समजत आहे.
सीबीआयची टीम घरातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुख देखील आपल्या काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, काही वेळाने सीबीआयची टीम पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या घरी परतली आहे. यामुळे अनिल देशमुखांनी आपला दौरा सोडून पुन्हा एकदा आपले घर गाठले आहेत. सीबीआयची टीम एकाच दिवसात पुन्हा एकदा आल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- केंद्र सरकार जबाबदारी झटकत असेल पण महाराष्ट्र सरकारने झटकू नये; काँग्रेसचा घरचा आहेर
- …अन् ‘त्या’ फोनमुळे नागपुरात ऑक्सिजनची मोठी मदत; फडणवीसांनी मानले आभार !
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- बुडत्याला काढीचा आधार; अखेर करमाळाकरांना ३० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार


