Share

बुमराहने तपासली मॅचवीनर के एल राहुलची बॅट; फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखुन दणदणीत पराभव केला. सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने हा विजय मिळवला आहे. तर मुंबईचा हा सलग दुसरा तर स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला आहे. शानदार अर्धशतकासाठी पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुल याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा कर्णधार के एल राहुलने नाबाद अर्धशतक झळकावकत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगीरी साठी राहुलला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजानी के एल राहुलला बाद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र कोणालाही यश आले नाही. त्यातच सामना संपल्यानंतर मुंबईचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहने राहुलकडे धाव घेत त्याच्या बॅटचे बारकाईने निरिक्षण केले. राहुलची बॅट आपल्या हाती घेत तपासली.

हे फोटो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाले. जणू बुमराह राहुलच्या बॅटमध्ये स्प्रिंग वैगेरे तर लावलेले नाही ना, असे विचारत असल्यासारखे भासत आहे. अनेकांनी यावेळचा फोटो शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंजाबच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सलग तीन सामन्यात पराभव स्विकारला. तर काल मुंबई विरुद्धच्या सामन्यात पंजाबने विजय मिळवत पुनरागमन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!