Share

उस्मानाबादेत गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली, दररोज लागतोय ४६ हजार लिटर ऑक्सिजन

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना रुद्र रुप धारण करत असून,कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या रुग्णांना आता दिवसाला ४६ हजार लिटर ऑक्सिजनची गरज लागत असून, रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत तिपटीने वाढ झाली आहे. मागीलवर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती. यामध्ये अनेक रुग्ण दुरुस्त होऊन घरी परतले. मागील वेळी मृत्यू दर हा कमी प्रमाणात होता. तर होम आयसोलेशमध्ये सुध्दा अनेकांनी कोरोनाला हारवले होते.

मध्यंतरीचा काही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता कोरोना आटोक्यात आला असे सर्वांना वाटत होते. मात्र अचानक कोरोनाची दुसरी लाट आल्याची घोषणा करण्यात आली. मागील कोरोनाच्या लाटेपेक्षा ही लाट उसळली. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना दिवसरात्र कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएससी सेंटरमध्ये गंभीर रुग्ण ३७ च्या आसपास आहेत. यांना दररोज कृत्रिम ऑक्सिजन दिला जात आहे.

मात्र रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन देण्यात सुध्दा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. १८ एप्रिलच्या आसपास दररोज १० जम्बो सिलिंडर म्हणजे १३ हजार लिटर कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत होती. अचानक गंभीर रुग्णांची संख्या व त्यांना द्यावा लागणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजनमध्ये वाढ झाली असून, आता दररोज ३५ जम्बो सिलिंडर म्हणजे ४६ हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. विशेष म्हणजे दिवसातून दोन वेळा ऑक्सिजन भरुन आणण्यासाठी गाडी आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!