Share

गरजेनुसारच नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश द्या – सीईओ अजित कुंभार

Published On: 

🕒 1 min read

बीड: जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोविड रुग्णांची व मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील उपलब्ध वैद्यकीय सुविधा देखील आता आपुऱ्य पडत आहेत तसेच ऑक्सीजनचा देखील तुटवडा तर राज्यभरात जाणवत आहे, तीच परिस्थिति बीड जिल्ह्यातही आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या तर वाढत आहेच मात्र त्यांना भेटायला येणारे तसेच त्यांच्या जवळ थांबणाऱ्य नातेवाईकांची देखील संख्या गरजेपेक्षा जास्त वाढत असल्याचे चित्र जिल्हा रुग्णालयात बघायला मिळाले.

जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षांमध्ये नातेवाइकांची सतत गर्दी होत आहे. नातेवाईक रुग्णालयात जाऊन बाहेर येतात, कुटुंबीयांमध्ये जातात, शहरात फिरतात यामुळे ते संक्रमित होऊन इतरांनाही संक्रमित करण्याचा धोका आहे. वारंवार सूचना देऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनही गर्दी हटत नसल्याने शुक्रवारी सकाळी सीईओ अजित कुंभार, पोलिस अधीक्षक आर. राजा, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, सीएस डॉ. सूर्यकांत गिते यांनी चार तास जिल्हा रुग्णालयाचा राउंड घेतला.

जिल्हा रुग्णालय हे सध्या कोविड रुग्णालय आहे. या ठिकाणी अनेक कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड रुग्णांच्या वॉर्डमध्ये जाण्यासाठी डॉक्टर, परिचारिका वगळता इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे मात्र, रक्षकांशी हुज्जत घालून, डबे देण्याच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये नातेवाइकांची मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही ही गर्दी कमी व्हायला तयार नाही, डबे देण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती आरोग्य विभागाने केली आहे. मात्र, नातेवाईक वॉर्डमध्ये जातच असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. मात्र, वॉर्डमधून जाऊन येणारे हे नागरिक कोरोना स्प्रेडर्स ठरत आहेत.

गंभीर रुग्णांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याजवळ नातेवाईक किंवा बेड असिस्टंट असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज असलेल्या रुग्णांजवळच नातेवाइकांना योग्य ती काळजी घेत थांबू दिले जाईल किंवा गंभीर रुग्णांची काळजी घेण्यासाठी बेड सहायक देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे सीईओ अजित कुंभार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!