Share

वडिलांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेने केलं मन मोकळं; शेअर केली भावनिक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील वर्षापासुन जगभरात कोरोनाने थैमान घालुन माणसाचे जगणे मुश्किल करुन टाकले आहे. कोरोनाशी देश गेल्या वर्षभरापासुन लढा देत आहे. यादरम्यान अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तिंना गमावले. यातच अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनेही तिच्या वडिलांना कोरोनामुळे गमावले. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच तिने भावनाना मोकळी वाट करुन दिली आहे.

भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिचं मन मोकळं करत जन्मदात्याला गमावल्याचं दुःख तिने तिच्या पोस्टमधून मांडलं आहे. या पोस्टमध्ये वडिलांना इस्पितळात नेल्यापासूनचा संपूर्ण प्रवास लिहिला आहे. तीने लिहीले आहे. ‘कोरोनाचा काळ हा कठीण आहे. माझे बाबा करोनाने गेले ही घटना इतक्या झटक्यात घडली की आपल्या हातात खरंच काही नाही या सत्याची अनुभूती पुन्हा एकदा धक्का देऊन गेली. माझ्या कोणत्या ही विश्वासावरचा माझाच विश्वास उडाला.’

https://www.instagram.com/p/CN_v4w0pZae/

ती पुढे लिहीते की, ‘बाबा आयसीयूमध्ये असताना, पलीकडच्या वॉर्डमध्ये नवीन जन्म होत असताना मी पाहायचे. वाटायचं, काय उपयोग या जगात येऊन. उद्या तुम्हाला ही ‘आयुष्य’ या नावाच्या मायाजळातून जावं लागणार आहे. आयुष्य या संकल्पनेचा राग आला होता’ या पोस्टमध्ये भाग्यश्रीने वडीलासोबतच्या आखेरच्या क्षणांचे वर्णन करत लिहीले की ‘शेवटच्या दोन दिवसात बाबांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आयसीयूमधून बाहेर शिफ्ट केलं. त्यांनी ही लढाई जिंकली असा समज माझ्या घरच्यांचा झाला. पण बाबांची तब्येत सुधारणार नसुन ते काहीक्षण बाबा माझ्या बरोबर असणार याची जाणीव मलाच होती. ‘कदाचित काय घडणार आहे माहित असुनही दोघांनाही एकमेकांना सत्याची जाणीव नव्हती करून द्यायची. आयुष्याचं रहस्य, त्यातलं सत्य हे कळणं अशक्य आहे पण तो स्पर्श, या जगात माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांचा स्पर्श मात्र खरा जाणवला. ‘ अशी पोस्ट करत तिने जगण्यातील हतबलता सगळ्यांसमोर मांडली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!