Share

महाविकास आघाडीने उच्च न्यायालयाचा निकाल सोईने वाचला- दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बाबत सोयीने विचार केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली.

या प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशात प्राथमिक तपासात आढळलेल्या गुन्ह्यांसदर्भात चौकशी करण्याचा सीबीआयला पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मा. उच्च न्यायालयाचा आदेश स्वतःच्या सोयीने वाचला असल्याने त्यांची अशी वक्तव्य येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत प्राथमिक चौकशीत जे आढळलं असेल, त्याप्रमाणे पुढील तपास करण्याचा अधिकार सीबीआयला आहे.’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या नंतर केंद्र सरकारने हा तपास सीबीआयकडे दिला होता. मात्र, या आरोपामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील वाद आणखीन वाढला आहे. एकाच वर्षानंतर महाविकास आघाडीमधील दुयाऱ्या नेत्याला राजीनामा देण्याची वेळ आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!