🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरुने राजस्थान रॉयल संघाचा १० गडी राखुन पराभव केला. या विजयासह आरसीबीची विजयी घौडदौड कायम आहे. आरसीबी संघाचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कोहलीचा निर्णय सार्थ ठरवत सीराजने तिसऱ्याच षटकांत सलामीवीर जोस बटलर(८) आणि डेव्हिड मिलर(०) दोघांना बाद करत राजस्थानला चांगली सुरुवात करुन दिली. राजस्थानच्या ४३ धावा झाल्यावर कर्णधार सॅमसन(२१) बाद झाल्यावर शिवम दुबे(४६), रियान पराग(२५) आणि राहुल तवेतिया(४०) यांनी संघाचा डाव सावरला. निर्धारित २० षटकात राजस्थानचा संघ १७७ धावांपर्यत मजल मारली. आरसीबीकडून सिराज आणि हर्षद पटेल दोघांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
राजस्थानच्या १७८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या आरसीबी संघाने राजस्थानच्या संघाला संघर्ष करण्याची संधीच दिली नाही. आरसीबीच्या दोन्ही सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पड्डिक्कल यांनी सुरुवातीपासुनच आक्रमक फंलदाजी करत राजस्थानच्या आव्हानातील हवा काढुन घेतली. दोघांनी नाबाद १८१ धावांची भागिदारी करत सतराव्या षटकातच राजस्थान रॉयल्स संघाचा १० गडी राखुन दणदणीत विजय मिळवला.
Earlier this kind of celebration and dedication was happened for @AnushkaSharma and now it's for #Vamika ????❤️#Anushka must be jealous now ????@imVkohli #ViratKohli#RCB pic.twitter.com/fe4vZxsyPx
— Tamil Viratians ???? (@Tamil_Viratians) April 22, 2021
कोहलीने या मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केल्यावर आपली मुलगी वामिकाला समर्पित केले. कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अर्धशतक पूर्ण करताच कोहलीने मैदानात आपल्या ऍक्शन द्वारे सांगितले हे अर्धशतक मुलीच्या नावे आहे. कोहलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- जीप व कारच्या अपघातात तिघे जखमी
- गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या २०४ जणांची कोरोना चाचणी ! ३ पॉझिटिव्ह
- RCBvsRR : टॉसवेळी विराट कोहली गडबडला, वाचा नक्की काय घडलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
