🕒 1 min read
मुंबई : सलग तीन सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर हैदराबाद संघाने पंजाब किंग्स विरुद्ध पहिला विजय मिळवला. या सामन्यात पंजाबने दिलेल्या १२१ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ गडी राखुन विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने गुणतालीकेत आपले खाते उघडले.
मात्र पहिल्या विजय मिळवल्यानंतर हैदराबादच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात संघाचा भाग नसलेला महत्वाचा खेळाडू टी नटराजनला दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो खेळु शकणार नाही.
हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने याबद्दल माहिती देताना म्हणाला की,’जर नटराजनने बायोबबल मधुन बाहेर जाउन तपासणी केली तर कोरोना नियमानुसार त्याला ७ दिवस विलगीकरणात रहावे लागेल. ही गोष्ट संघासाठी चांगली नाही. आमचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवुन आहोत. मात्र एकदा त्याला तपासणी साठी बाहेर जावेच लागणार आहे.’ नटराजनच्या दुखापतीमुळे हैदराबाद संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- आरसाबीची विजयी घौडदौड कायम; राजस्थानविरुद्ध १० गडी राखुन मिळवला ‘रॉयल’ विजय
- जीप व कारच्या अपघातात तिघे जखमी
- गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या २०४ जणांची कोरोना चाचणी ! ३ पॉझिटिव्ह
- RCBvsRR : टॉसवेळी विराट कोहली गडबडला, वाचा नक्की काय घडलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
