Share

गंगापूर-खुलताबाद मतदार संघात तातडीने कोरोना उपाययोजना करा : आ. प्रशांत बंब

Published On: 

🕒 1 min read

खुलताबाद : गंगापूर-खुलताबाद मतदार संघात तातडीने कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर-खुलताबाद मतदार संघात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात ऑक्सिजन बेडची व्यवस्था नसल्याने संबधित रूग्णाला सरळ औरंगाबाद येथे रेफर केले जात आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयांची हीच अवस्था असून, यामुळे औरंगाबाद शहरातील घाटीसह सर्वच रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होण्यास प्रचंड अडचणी येत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर आणखी ताण वाढत आहे.

त्यासाठी खुलताबाद येथे ग्रामीण रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर व ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करून अपेक्षित डॉक्टर व इतर मनुष्यबळाची उपलब्धता करण्यात यावी, गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ १० व्हेंटिलेटर कार्यान्वीत करून त्यासाठी आवश्यक डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे यासह आदी मागण्या आ. प्रशांत बंब यांनी केल्या आहेत.

या नियोजनासाठी खर्च वाया गेला तरी चालेल. परंतु ,ही यंत्रणा येत्या १० दिवसात उभारण्यात यावी. जेणेकरून येणार्‍या परिस्थिवर मात करून लोकांचे जीव वाचवता येऊ शकतील. अन्यथा परिस्थिती आपल्या सर्वांच्या हाताबाहेर जाईल. यामुळे कोरोनापासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी वरील प्रमाणे नियोजन करावे. अशी मागणी आ. बंब यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!