चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात मुंबईचा संघ केवळ तीन विदेशी खेळाडूसोबत मैदानात उतरला होता. या सामन्यात मुंबईने वेगवान गोलंदाज ऍडम मिल्नेच्या जागी मुंबईचा अनुभवी फिरकीपटू जयंत यादवला संघात संधी दिली. जंयत यादवने या सामन्यात इतर फलंदाज अयशस्वी होत असताना २२ चेंडुत २३ धावांची छोटेखानी खेळी केली. यावेळी त्याने इशान किशनसोबत सातव्या गड्यासाठी ३९ धावांची भागीदारी केली. तर गोलंदाजी करताना डावातील दुसरे षटक टाकताना फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर पृथ्वी शॉला माघारी पाठवले. चार षटकात त्याने २५ धावा देत पृथ्वीचा महत्वाचा बळी मिळवला.
जयंत यादवचा या आयपीएलमध्ये हा पहिलाच सामना होता. यापूर्वी जयंतने आयपीएलचा अखेरचा सामना मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात खेळला होता. स्थानीक पातळीवर जयंत हा हरियानाकडून खेळतो. जयंत यादवने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने १५ सामने खेळताना ७ बळी देखील मिळवले आहेत. जयंतने आंतरराष्ट्रीय पातळीवर ४ कसोटी व १ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नगरमध्ये जीव जात आहेत अन् हसन मुश्रीफ गोकुळच्या निवडणुकीत बोंबलत बसलेत’
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न
- धक्कादायक : नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
- उस्मानाबादेत वाढत्या रुग्णसंख्ये सोबत कोविड केअर सेंटरच्या मागणीत वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

