🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.
अहमदनगरमध्ये तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. मंगळवारी एकाच दिवसात जिल्ह्यात २७९५ नवे बाधित आढळून आले आहेत. तर मंगळवारी दुपारी बारा वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने २३ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे. अशात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
‘राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत की नाही हे उद्धव ठाकरेंनी तपासून पहाव, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तिकडे ३६०० मतदार असलेल्या गोकुळच्या निवडणूकीत बोंबलत बसलेत. एका एका दिवसात ३०-३५ लोक नगरमध्ये मृत्यूमुखी पडत आहेत. मनसेने तिथे पालकमंत्री शोधून द्या ५००० हजार रुपये मिळवा असे आंदोलन देखील केले. अशात उद्धव ठाकरेंनी छडी घेऊन पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे त्या जिल्ह्यातून हलायचं नाही’ असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न
- धक्कादायक : नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
- उस्मानाबादेत वाढत्या रुग्णसंख्ये सोबत कोविड केअर सेंटरच्या मागणीत वाढ
- अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाचा जिवलग ‘वीर’ अनंतात कालवश; पोस्ट शेअर करत दिला निरोप


