🕒 1 min read
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून हे सरकार लवकरच पडणार असल्याची भविष्यवाणी करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या चरणी साकडे घातले आहे. श्री राम नवमीच्या शुभेच्छा देतांना राणे यांनी आपल्या मनातील ही भावना व्यक्त केली.
सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता भाजपच्या वतीने सत्ताधारी महाविकास आघाडीवर अनेक आरोप करण्यात येत आहे. ठाकरे सरकार लवकरच पडणार असल्याचे भविष्य भाजप नेते नारायण राणे यांनी या आधी अनेक वेळा व्यक्त केले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार अद्याप तरी स्थिर आहे. आता रामनवमीच्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छा देताना राणे यांनी रामचंद्राकडेच सरकार पडण्यासाठी साकडे घातले आहे. आपल्या पोस्टमध्ये राणे यांनी लिहिले की, ‘अकार्यक्षमतेमुळे राज्याला कोरोनाच्या महासंकटात लोटणाऱ्या राज्यातील सरकारचा लवकर नायनाट व्हावा आणि कोरोनारुपी राक्षसाचा अंत करण्यासाठी भाजप सरकार सत्तेवर यावं, ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना.’
श्री राम नवमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…!
अकार्यक्षमतेमुळे राज्याला कोरोनाच्या महासंकटात लोटणाऱ्या राज्यातील सरकारचा लवकर नायनाट व्हावा आणि कोरोनारुपी राक्षसाचा अंत करण्यासाठी भाजप सरकार सत्तेवर यावं, ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना.. #RamNavami #भगवानराम
— Narayan Rane (@MeNarayanRane) April 21, 2021
कोरोनाच्या या संकटाच्या काळातही महाविकास आघाडीमधील नेते असो की विरोधी पक्षाचे नेते, सर्वांनीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा सपाटा लावलाय. यात राज्यातील सर्वसामान्या रुग्णांचे मात्र प्रशासनाच्या काराभारामुळे पुरते हाल होत आहे. एका-एका इंजेक्शनसाठी किंवा ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. त्यात राणेंनी तर प्रभू रामचंद्राकडेच सत्तांतरासाठी साकडे घातलेय.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न
- धक्कादायक : नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
- उस्मानाबादेत वाढत्या रुग्णसंख्ये सोबत कोविड केअर सेंटरच्या मागणीत वाढ
- अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाचा जिवलग ‘वीर’ अनंतात कालवश; पोस्ट शेअर करत दिला निरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

