🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी देशातील डॉक्टरांशी संवाद साधला होता. तसेच आज त्यांनी लस उत्पादकांशीही संवाद साधला होता. याशिवाय त्यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी सुरुवात करतानाच त्यांनी सध्याच्या कोरोना लाटेला तुफान म्हणून संबोधले आहे. कोरोनाची हि लाट प्रचंड मोठी आहे. आणि यासाठी देशवासियांना धैर्यानी या संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कोरोना विरोधात देश आज पुन्हा एक मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती सुधारली होती. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. जे तुम्ही सोसत आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या लोकांनी आपल्या माणसाला गमावलं त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परिवाराचा एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत असून सरकारकडूनही यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसंच आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. १ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परिवहन महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारचा नवा फंडा
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात मागणी, निर्मात्यांना नोटीस
- मराठा आरक्षण मिळाले नाही तर मराठ्यांचा तांडव रोखूनच दाखवा! साष्टपिंपळगाव मराठा आंदोलकांचा इशारा
- मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांच्या मागणीची तरी दखल घ्यावी-प्रसाद लाड
- पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन लागणारच – जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
