🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण हे कोरोनाची साखळी तोडण्याचा महत्वाचा पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर काल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ‘केंद्र सरकारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीची दखल घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मी आभार मानतो. लसीकरणासाठी वयाची मर्यादा कमी केल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी मदत होईल,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या मतदारसंघातील आणि ते पालकमंत्री असलेल्या भागातील नागरिक त्यांचा शोध घेत असल्याची उपहासात्मक टीका भातखळकर यांनी केली आहे. ‘आमदार आदित्य ठाकरेंना वरळीची जनता आणि पालक मंत्री म्हणून उपनगरातील जनता शोधते आहे. मोदींच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी पोस्टरवर का होईना त्यांचे दर्शन झाले हे मुंबईकरांचे भाग्यच! जमल्यास मुख्यमंत्र्यांनाही घरातून बाहेर पडण्याचा आणि थोडं काम करण्याचा सल्ला द्या, बघा ऐकतात का?’ असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
आमदार आदित्य ठाकरेंना वरळीची जनता आणि पालक मंत्री म्हणून उपनगरातील जनता शोधते आहे. मोदींच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी पोस्टरवर का होईना त्यांचे दर्शन झाले हे मुंबईकरांचे भाग्यच!
जमल्यास मुख्यमंत्र्यांनाही घरातून बाहेर पडण्याचा आणि थोडं काम करण्याचा सल्ला द्या, बघा ऐकतात का? pic.twitter.com/cAK4Lyz51x— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व धार्मिक स्थळांच्या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करण्याची मागणी
- …म्हणून अजित पवार नाराज, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार भूमिका ?
- ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’मुळे जाग्या झाल्या ‘वॉटर एक्सप्रेस’च्या आठवणी
- केंद्रातलं सरकार बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, त्यानं संपूर्ण देशातला कोरोना नष्ट होईल’
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

