🕒 1 min read
नागपूर : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. आरोग्य यंत्रणा देखील कोलमडत आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भीती व्यक्त केली आहे.
कोरोना विरोधातील लढाईत ऑक्सिजन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. राज्याचे स्वतःचं साडेबाराशे मेट्रीक टन उत्पादन आहे. शिवाय साधारणपणे ३०० मेट्रिक टन आपण बाहेरून आणतो आहोत. राज्यात दररोज साडेपंधराशे मेट्रीक टन ऑक्सिजनच वापर आहे.पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजनसाठी पुढे अडचण येऊ शकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari यांच्या प्रयत्नाने टॅंकरच्या माध्यमातून १६ टन ऑक्सिजनची पहिली खेप 'भिलाई स्टील प्लांट'मधून नागपूरला पोहोचली आहे. आज मध्यरात्रीपर्यंत भिलाई मधून दुसरी आणि बेल्लारी मधून एकूण ३६ टन अतिरिक्त ऑक्सिजन नागपूरला पोहोचेल. pic.twitter.com/3tDG6al7VZ
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) April 19, 2021
दरम्यान, एका बाजूला अशी भीषण परिस्थिती असताना एका दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला आहे. गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात दररोज ऑक्सिजन पुरवठा होण्यास प्रारंभ झाला आहे.
ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह तो साठवून ठेवण्यासाठी सिलेंडर्सचीही आवश्यकता असते. त्यासाठी गडकरी यांच्या प्रयत्नातून १००० रिकाम्या सिलेंडर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सिलेंडर्स रिकामे झाल्यानंतर ते पुन्हा भरून आणण्यासाठीदेखील तातडीने भिलई येथे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होणार? मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- सर्व धार्मिक स्थळांच्या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

