Share

‘मला कोणीही ‘अनफिट’ म्हटलेले मला आवडत नाही’

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. यासोबतच आयपीएलच्या गेल्या 14 वर्षांच्या इतिहासात धोनीने मोठं यश मिळवलं आहे, सोबतच त्याने अनेक विक्रमदेखील केले आहेत.

महेंद्र सिंग धोनी 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिला सामना खेळला. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला गेला. सुरुवातीपासूनच धोनी चेन्नईच्या संघाचा कर्णधार आहे. काल 19 एप्रिल 2021 रोजी धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा खेळला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळवण्यात आला. आयपीएलमधील कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना आहे. धोनीने हा एक मोठा रेकॉर्ड आज आपल्या नावे केला आहे.

या विजयसह गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. राजस्थानला तीन सामन्यात दुसरा पराभव पत्करावा लागला आणि सहाव्या क्रमांकावर आहे. हा सामना सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी खास होता.

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या तीस वर्षीय धोनीने कबूल केले की वृद्ध होणे आणि तंदुरुस्त राहणे या दोन सर्वात कठीण गोष्टी आहेत. धोनी म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा तुम्हाला कोणी अनफिट म्हटले तर ते तुम्हाला आवडणार नाही’ सहाजिकच मलादेखील ते आवडणार नाही. मला तरुण खेळाडूंशी स्पर्धा करायची आहे, ते खूप फिट आहेत त्यामुळे त्यांना स्पर्धा देणं नेहमीच आव्हानात्मक असतं. असं धोनी पुढे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!