🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाने ४ झेल घेतले. जडेजाने मनन वोहरा, रियान पराग, ख्रिस मॉरिस आणि जयदेव उनाडकट या चार फलंदाजाचे झेल घेतले. यासह चेन्नईकडुन फाफ डू प्लेसिसनंतर एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा तो दुसरा खेळाडू बनला.
A resounding victory for @ChennaiIPL against #RR by 45 runs.
4 fine catches and 2 wickets for @imjadeja ????????#VIVOIPL pic.twitter.com/xMtP2v2elL
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजस्थानच्या जयदेव उनटकटने लाॅग ऑफच्या दिशेने जोरदार फटका मारला. पण शार्दुलने टाकलेला चेंडू हवेत जास्तवेळ राहिला. त्यामुळे बॉन्ड्री लाईनवर रविंद्र जडेजाने झेल पकडला. त्यानंतर त्याचं अजब सेलिब्रेशन पहायला मिळालं आहे. त्याने डगआऊटच्या दिशेने 4 झेल घेतल्याचा इशारा केला. त्याने फोन करून सांगा असा इशारा देखील केला.
महत्वाच्या बातम्या
- संचारबंदीमध्ये घरगुती वीजवापराकडे लक्ष ठेवा – महावितरण
- सीबीएसई पाठोपाठ आता ‘या’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द !
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- जालना जिल्हात लसींचा तुटवडा; मागणी पावणेदोन लाख लसींची मिळाल्या फक्त एक हजार
- राजस्थान विरुद्धच्या सामन्यात जडेजाचे चार झेल आणि धोनीचे ‘ते’ ट्विट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

