जालना: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही नागरिक घरी बसत नसल्याने पोलिसांना रस्त्यावर उतरण्याची गरज भासली आहे, या पार्श्वभूमीवर पोलिस पॉइंट करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात आहेत. पॉइंटवर व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही याबाबत पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी रविवारी भेटी देऊन त्याची पाहणी केली. संचारबंदी कडक करण्यात येत असून एसटीची वाहतूकही केवळ ५० टक्केच सुरू आहे.
पोलिस, पालिकेचे पथक, होमगार्डसह जालन्यातील विविध पॉइंटवर दीडशे जण कार्यरत आहेत. आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ हजार ४० जणांकडून ६ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. दुकाने उघडून अथवा गर्दी करून घेणाऱ्यांवर कारवायांसाठी चारही पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी गल्लीबाेळात खबरे नियुक्त केले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. खासगी, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहत नसल्यामुळे कोरोना साखळीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवार रोजी जालना शहरात पोलिसांनी कडक निर्बंधांची अंमलबजावणी करत शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. विदाऊट मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने शहरांतील रस्ते ओस पडल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मामा चौक, सावरकर चौक पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीमुळे निर्मनुष्य झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- बात निकली ही है तो दूर तक जायेगी…रोहिणी खडसे आणि भाजप आमदारामध्ये खडाजंगी !
- विजयानंतर जडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन ; फोन करून दिला असा इशारा
- नियमांना कोणी जुमानेना ! राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ नियम लागू होण्याची शक्यता !
- रेमडिसिवर बाबत खोटी माहिती प्रसारीत केल्याबद्दल साकेत गोखले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
- आयपीएलमध्ये आज हिटमॅन विरुद्ध स्पायडरमॅन; चेन्नईत मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

