Share

सर्व धार्मिक स्थळांच्या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून दिवसेंदिवस बाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसतेय. सोमवारी देशात २ लाख ७३ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर गेल्या २४ तासात आज २ लाख ५६ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळ्याचे समोर आले आहे. या कालावधीत १ हजार ७६१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे. संचारबंदील लावूनही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने सरकार चिंतेत असून या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक दुपारी साडेतीन वाजता बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे यामुळे कोरोनाच्या रुग्णांना बेडची कमतरता जाणवत आहेत. महाराष्ट्र सरकारने सर्व धार्मिक स्थळांचे हॉल ताब्यात घेऊन या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करावे जेणेकरून कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध होतील अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!