मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सीएसकेने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात १८८ धावा बनवत एक अनोखा विक्रमाची नोंद केली आहे. कोणत्याही फलंदाजाने ४० धावा न बनवता आयपीएलच्या इतिहासात उभारलेली ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. हा विक्रम यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या नावे होता. आयपीएल २०१७ मध्ये मुंबईने रायझिंग पुणे सुपरजायंटविरूद्ध १८४ धावा केल्या होत्या. तर डेक्कन चार्जर्सचा संघ तिसऱ्या स्थानी असून त्यांनी २००८ मध्ये दिल्ली डेरडेव्हिल्सविरुद्ध १८२ धावांपर्यंत मजल मारली होती.
चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८८ धावांचा पल्ला गाठला. १८८ धावा करताना चेन्नईच्या संघाने एक अनोखा विक्रम केला. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज फक्त १० धावा बनवू शकला. तर प्लेसीसने १७ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. यानंतर मधल्या फळीतील मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू व कर्णधार एमएस धोनी यांनी अनुक्रमे २६, १८, २७ आणि १८ धावा बनविल्या. अष्टपैलू सॅम करनने १३ आणि ड्वेन ब्राव्होने ८ चेंडूत नाबाद २० धावा चोपल्या.
महत्वाच्या बातम्या
- बात निकली ही है तो दूर तक जायेगी…रोहिणी खडसे आणि भाजप आमदारामध्ये खडाजंगी !
- विजयानंतर जडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन ; फोन करून दिला असा इशारा
- नियमांना कोणी जुमानेना ! राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ नियम लागू होण्याची शक्यता !
- रेमडिसिवर बाबत खोटी माहिती प्रसारीत केल्याबद्दल साकेत गोखले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
- आयपीएलमध्ये आज हिटमॅन विरुद्ध स्पायडरमॅन; चेन्नईत मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

