Share

रेमडिसिवर बाबत खोटी माहिती प्रसारीत केल्याबद्दल साकेत गोखले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

Published On: 

मुंबई – रेमडिसिवर इंजेक्शन बाबत खोटी माहिती प्रसारीत केल्याबद्दल साकेत गोखले यांच्या विरोधात भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खोटी माहिती प्रसारीत करून जनतेच्या मनात घबराट निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, गोखले यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 505 (1), माहिती, तंत्रज्ञान कायदा 2000 आणि आपत्ती निवारण कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी  पांडे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

पांडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोखले यांनी 17 एप्रिल 2021 रोजी अनेक ट्विट करत मुंबई पोलिसांनी 4.75 कोटी किमतीच्या रेमडिसिवर चा साठा जप्त केला असून भारतीय जनता पार्टीने हा साठा केला असल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारच्या साथीने रेमडिसिवरचा अवैध साठा करीत असून भाजपा कार्यालयात हा साठा करण्यात आल्याचे ट्विटही गोखले यांनी केले होते.

गोखले यांनी ट्विट मध्ये नमूद केलेली माहिती धादांत खोटी असून जनतेच्या मनात घबराट निर्माण करणारी आहे. त्यामुळेच गोखले यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. गोखले यांनी केलेले ट्विट तक्रारी सोबत जोडण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!