Share

शहरात जोरात नाका बंदी तरीही तीन दुचाकी चोरीला

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी चोरांनी लांबवल्या. विशेष म्हणजे शहरात २४ तास नाका बंदी सुरु असूनही दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. पहिली घटना सिडकोतील बजरंग चौकात घडली. सचिन त्र्यंबक सुशीर (४५, रा. बजरंग चौक, एन-६) यांनी १४ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास सिडको, एन-७ भागातील एका मेडिकलसमोर दुचाकी (एमएच-२०-एफक्यु-३०७२) उभी केली होती. चोराने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात लांबवली.

दुसरी घटना एमआयडीसी चिकलठाणा येथे घडली. जुन्या आयडीया कॉल सेंटर समोरील पटेल वॉटर फिल्टर प्लॉन्टजवळ शेख मोहसीन रसूल (२५, रा. रहेमानिया कॉलनी, आझाद चौक) यांनी दुचाकी (एमएच-२०-सीजे-४१९१) उभी केली होती. चोराने त्यांच्या देखील दुचाकीचे हँडल लॉक तोडून ती लांबवली.

तसेच सागर रामराव जगताप (४३, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) यांनी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भडकलगेटजवळ दुचाकी (एमएच-२०-ईएच-८८४५) उभी केली होती. चोराने हँडल लॉक तोडून जगताप यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!