🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पण कोरोनामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता भाजपनेही मोठा निर्णय घेतलाय. बंगालमध्ये होणाऱ्या भाजपच्या रॅलीत आता पाचशेपेक्षा अधिक लोकांचा सहभाग नसेल असे भाजपने स्पष्ट केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या प्रचारसभांमध्ये फक्त पाचशे लोकांचीच उपस्थिती असणार आहे.
It has been decided that only small public meetings with not more than 500 people will be held by PM Modi and other central ministers in West Bengal. All these public meetings will be held in open spaces following COVID19 guidelines: Bharatiya Janata Party (BJP)
— ANI (@ANI) April 19, 2021
कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी भाजपने एक अभियान राबवण्याचे ठरवले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष सदस्यांना ‘अपना बूथ कोरोना मुक्त’ अभियान राबवण्याच्या सूचना केल्यात. नड्डा यांनी राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांच्या पक्ष प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी विविध राज्यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना लोकांच्या मदतीसाठी सहाय्यता डेस्क आणि हेल्पलाईन नंबर जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
भाजपने सहा कोटी मास्क आणि सॅनिटायझर वाटपाचं लक्ष्य ठेवल्याचं नड्डा यांनी म्हटलंय. कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. तसंच भाजपच्या सदस्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय राखला जावा, अशा सूचनाही नड्डा यांनी विविध राज्यातील भाजपच्या प्रमुखांना दिल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून स्वच्छता अभियान राबवले जावे. कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी, असंही नड्डा यांनी म्हटलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाजप सदस्यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आदेश नड्डा यांनी दिले आहेत.
राहुल गांधींनी सभा केल्या रद्द
दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधीनी प्रचारसभा रद्द करण्यासोबत इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करण्याचं आवाहन केलं आहे. ‘पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मी बंगालमधील माझ्या पुढील सर्व सभा, रोड शो रद्द करत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांनीही मोठ्या सार्वजनिक सभा घेणं टाळाव्यात. कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा’, असं आवाहन राहुल यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
- ८० कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भामटा गजाआड
- संजय राठोडनंतर यवतमाळचे नवे पालकमंत्री भुमरे विस्कटलेली घडी कशी बसवणार?
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

