शासन निर्णयान्वये ‘ब्रेक द चेन’ दि. १५ एप्रिल २०२१ पासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. या स्थितीतील जिल्ह्यातील शिवभोजन थाळी वितरणात प्रतिदिन संख्येमध्ये दीड पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांना सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्राच्या प्रतिदिन संख्येमध्ये १५ एप्रिलपासून एक महिन्याच्या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे दीड पटीने वाढ केलेली आहे.
शहरासह जिल्हामधील शिवभोजन थाळ्यांची स्थिती
परभणीतील बसस्थानकासमोरील बालाजी रेस्टॉरंटला ४१३, नवा मोंढ्यातील गायत्री उपहारगृहाला ४१३, जिल्हा रुग्णालयातील पाकगृहाला ४१३, गंगाखेड रोडवरील राधेगोविंद उडपी आणि फॅमिली रेस्टॉरंटला २२५, सेलू बसस्थानकासमोरील शिवशंकर हॉटेलला ११२, जिंतूर बसस्थानकासमोरील जगदंब उपहारगृहाला ११२, पूर्णा येथील स्टेशनरोड वरील अभिरुची भोजनालयाला ११३, सोनपेठ येथील श्री दत्ताकृपा भोजनालयाला ११२, पालम येथील माऊली कृपा भोजनालयाला ११२, पाथरी येथील जय सेवालाल सेवाभाी संस्थेला ११२, मानवत येथील ज्ञानज्योती महिला बचत गटाला ११३ अशा अशा एकूण २ हजार २५० थाळ्यांना संख्या वाढवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

