Share

मोठी बातमी : राज्यातील किराणा दुकाने आता ‘या’ वेळेतच राहणार सुरु

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यासाठीचे पहिले पाऊल आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उचलले आहे, किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा आणि किराणामाल खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्यांवर वर्दळही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणून हा निर्णय आज घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!