Share

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर : पालकमंत्री चव्हाण  

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर देत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी जंबो कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी केले. नांदेड जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील, त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. सोळा तालुक्यासह आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठा असल्याचे सांगितले.

प्रत्येक तालुका पातळीवरील आणि ग्रामीण भागात जिल्ह्यातील बाधितांना आरोग्याच्या सुविधा सुलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितले आहे. आजच्या घडीला ऑक्सिजनच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड महानगरातील आणि जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधिताची संख्या लक्षात घेवून भक्ती लॉन्स येथे आज चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवून जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन व पाहणी केली.

नांदेड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटरसह मालेगाव, अर्धापूर सारख्या गावातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड बाधितांसाठी उपचार केंद्र सुरु करीत आम्ही ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि परिपूर्ण करु असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी मोठी आहे. पण याचा तुटवडा आहे हे देखील नाकारता येत नाही. राज्यात सर्वत्रच याचा तुटवडा असून शासनातर्फे वितरक आणि उत्पादक यांच्याशी समन्वय साधला जात आहे. जिथे आवश्यकता वाटते आहे, त्याठिकाणी कायदेशिर कार्यवाही करुन मार्ग काढीत असल्याचे त्यांनी या वेळी चव्हाण यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!