🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. आरोग्य यंत्रणा देखील कोलमडत आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भीती व्यक्त केली आहे.
ऑक्सिजन हा सगळ्या महत्वाचा विषय आहे. राज्याचे स्वतःचं साडेबाराशे मेट्रीक टन उत्पादन आहे. शिवाय साधारणपणे ३०० मेट्रिक टन आपण बाहेरून आणतो आहोत. राज्यात दररोज साडेपंधराशे मेट्रीक टन ऑक्सिजनच वापर आहे. मला असं वाटतं हे प्रमाण खूप मोठं आहे. पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजनसाठी पुढे अडचण येऊ शकेल असे टोपे म्हणाले.
येत्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे ७ ते ११ या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली. असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरेजी, तुमच्या वाचाळवीरांना आवर घाला’, गाढवाच्या गळ्यात आ.गायकवाडांचा फोटो घालून धिंड
- सोनियांना प्रत्युत्तर! ‘भेदभाव नाहीच, ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला’
- ‘कोरोना संकटात मोदी दिवसातील १८-१९ तास काम करताहेत’, मंत्री गोयल यांचा दावा
- ‘महाविकास आघाडी केंद्राकडे बोट दाखवून स्वतःचं अपयश लपवू शकत नाही’ :आठवले
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’


