Share

‘गलिच्छ राजकारण करू नका, एक दिवस जनता तुम्हाला खड्ड्यात घालेल’

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण अक्षरशः तडफडून जीव सोडत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक गलिच्छ राजकारण करण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं असताना आता या वादात शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी उडी घेतलेली आहे. ‘रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या राजकारणामुळे सर्वसामान्य माणसांचा बळी जात आहे. पक्षाच्या मुख्य कार्यालयात इंजेक्शन ठेवणे आणि त्यातून सर्वसामान्य माणसांना वेठीस धरायचे असे गलिच्छ राजकारण करू नका. अन्यथा एक दिवस जनता तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

‘रेमडेसिवीर औषध एखाद्या पक्षाच्या कार्यालयात मिळते याचा अर्थ काय? हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. इंजेक्शनची टंचाई होणार हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून पक्षाच्या कार्यालयात अशा इंजेक्शनचा साठा करणे म्हणजे सामान्य माणसांची पिळवणूक करणे असाच त्याचा अर्थ होत आहे,’ असे बोलून माजी खासदार शेट्टी यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षरित्या गंभीर आरोप केले.

दरम्यान, आता राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी दिली तक्रार, सरकारी कामात व्यत्यय आणणे तसेच पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!