🕒 1 min read
मुंबई – ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. पण परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडूनच दिले जाऊ लागले आहेत.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेतली तर लोकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या काही दिवसांत असेच होत राहिले तर नाईलाजास्तव लवकरच राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असा इशारा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.
तर दुसऱ्या बाजूला कडक लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असं ते म्हणाले.
दिल्लीने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती आम्ही घेत आहोत. तिथेही लोकल सेवा आहे, ते कशा पद्धतीने नियोजन करतायत त्यावर चर्चा करु असे वडेट्टीवार म्हणाले. "कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी केली. पण त्याचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही असे वडेट्टीवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोना संकटात मोदी दिवसातील १८-१९ तास काम करताहेत’, मंत्री गोयल यांचा दावा
- केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही म्हणून घरी जातोय, म्हणत कोरोना बाधित रुग्णाने ठोकली धूम
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे बालीश राजकारण आता थांबवावे’
- महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार
- लातूरात एकाच दिवसात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बातमी चूकीची, जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

