नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडीसिवरच्या कमतरतेने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. अशात ज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वयाचा अभाव चिंतेचा विषय ठरतोय. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्तांतरावर भाष्य केलंय.
‘तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेंचा विषय आहे का?’ असा प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘महाराष्ट्रातील करोना संक्रमणाची चिंता जरुर आहे. पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे’, असं शहांनी म्हटलंय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला देलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी हे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीचे तपशील सांगण्यास शहा यांनी नकार दिला आहे. अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीची जोरदार चर्चा झाली होती, परंतु या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला भेटीच्या चर्चेंवर थेट बोलण्यास अमित शहा यांनी टाळाटाळ केली. महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना महाआघाडी सरकारमध्ये याच विषयावर मोठा राजकीय तणाव निर्माण झालेला दिसला होता.
महत्वाच्या बातम्या
- सिल्लोडमध्ये लसीकरणाला ब्रेक, रुग्णांची संख्या पोहोचली हजारीपार
- ‘रेमडेसिव्हीरबद्दल फडणवीस आणि दरेकर यांची भूमिका महाराष्ट्र द्वेषी’
- पूर्णेत ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देणार : खा. संजय जाधव
- केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही म्हणून घरी जातोय, म्हणत कोरोना बाधित रुग्णाने ठोकली धूम
- पहिल्या टप्प्यात होणार तीन हजार कामगारांचे लसीकरण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

