Share

‘रेमडेसिव्हीरबद्दल फडणवीस आणि दरेकर यांची भूमिका महाराष्ट्र द्वेषी’

Published On: 

मुंबई : रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व रात्री त्यांना अटक झाल्याचे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना दुसरीकडे जोरदार राजकारणही पाहायला मिळत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रेमडेसिव्हीरबद्दल फडणवीस आणि दरेकर यांची भूमिका महाराष्ट्र द्वेषी असल्याचा घणाघात जगताप यांनी केला आहे.

‘फडणवीस हे सत्तेसाठी किती लाचार झाले आहेत. त्यांच्या परवाच्या कृत्यामुळे राज्याचं नाव धुळीस मिळालं. रेमडेसिव्हीरचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस जातात?’ असा उपरोधिक सवालही भाई जगताप यांनी विचारला आहे. ‘सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी फडणवीस आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे,’ अशी मागणीही जगताप यांनी केली आहे. तसेच ‘लॉकडाऊन उठल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसांची १०० पापे भरली आहेत. रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार,’ असा इशाराच भाईंनी यावेळी दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी दिली तक्रार, सरकारी कामात व्यत्यय आणणे तसेच पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या       

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!