🕒 1 min read
मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली.
हे समजताच रात्री उशिरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक वादावादी देखील झाली होती. हे सर्व समोर येताच भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सोबत उपस्थित असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. ‘सन्माननीय गृहमंञी, काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून पोलिसांवर दबाव निर्माण करून एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता, गुन्हा करणारा जितका दोषी असतो तितकाच दोषी गुन्हेगाराला पाठीशी घालणारा असतो. दोन्ही आरोपींना एकच शिक्षा असते,त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिल्याबद्धल पोलीसांनी फडणवीस आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून अटक करावी.’ अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
चाकणकर यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची. आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे अशा शब्दात अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे @Dev_Fadnavis ना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय?#Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी
सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय पथकाच्या सूचनांना मनपाने टांगले ‘हॉटस्पॉट’च्या वेशीवर !
- कोरोनातून सावरताच दिपीका-रणविरच्या पावलावर पाउल टाकत आलिया-रणबीर निघाले मालदीवला
- निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’
- विकी- कतरिना एकाच वेळेस करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ; सर्वत्र रंगली प्रेमाची चर्चा
- कोरोना अलर्ट! उस्मानाबादेत मृत्यूदर सर्वाधिक, पॉझिटिव्हिटी रेट ही वाढला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

