🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात दररोज दिड हजारांच्या घरात रुग्णसंख्या निघत आहे. शहरात एकूण २६ कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी ८ भाग हे कोरोना संसर्गाचे बिग हॉटस्पॉट घोषित केले आहेत. मात्र याठिकाणी कुठल्याही उपाययोजना महापालिकेने अद्यापपर्यंत राबवलेल्या नाहीत. हॉटस्पॉट भागात नागरिकांची ये-जा बंद करा. कडक निर्बंधांचे पालन करा, अशी स्पष्ट ताकीद केंद्रीय पथकाने पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली आहे. मात्र अजूनही याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच लॉकडाऊनच असल्याने नागरिक बाहेर येणारच नाहीत. असे पालिका प्रशिसनाचे म्हणणे आहे. हे विशेष.
शहरातील वेगवेगळ्या भागातून रुग्ण निघत असल्याने रुग्ण संख्येनुसार मायक्रो, मिनी आणि लार्ज असे कंटेन्मेंट भाग तयार करण्यात आले आहेत. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असल्याने शहरात केंद्राचे पथक पाहणीसाठी आले होते. ९ एप्रिल रोजी या पथकाने शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून कोरोना परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी शहरातील काही हॉटस्पॉट वसाहतींमध्ये भेटी दिल्यावर केंद्रीय पथकाच्या पाहणीत आले कि याठिकाणी नागरिकांचा मुक्तसंचार आहे. तसेच यावर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने कुठलीही व्यवस्था केलेली नाही. त्यावेळी याठिकाणी मुक्तपणे वावरणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पथकाने पालिकेच्या आरोग्य विभागाला सूचना केल्या. मात्र यावर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.
लॉकडाऊनमुळे कर्मचारी नियुक्तीची गरज नाही
गतवर्षी ज्याप्रमाणे पत्रे लावून वसाहत सील केली जात होती. यंदा त्याप्रमाणे केलेले नाही. त्यामुळे हॉटस्पॉट भागातील नागरिकांच्या मुक्तपणे वावरणाऱ्यावर बंधने नाहीत. यंदा आपण हॉटस्पॉट, आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र असे पोस्टर लावलेले आहे. तर मिनी कंटेन्मेंट झोनमध्ये स्टिकर लावले आहेत. तसेच आता लॉकडाऊन, कर्फ्यू असल्याने लोक बाहेर येणार नाहीत. त्यामुळे कर्मचारी नियुक्तीची वेगळी गरज नाही. तेवढे मनुष्यबळही आपल्याकडे नाही.
– डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनातून सावरताच दिपीका-रणविरच्या पावलावर पाउल टाकत आलिया-रणबीर निघाले मालदीवला
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’
- विकी- कतरिना एकाच वेळेस करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ; सर्वत्र रंगली प्रेमाची चर्चा
- कोरोना अलर्ट! उस्मानाबादेत मृत्यूदर सर्वाधिक, पॉझिटिव्हिटी रेट ही वाढला
- ऑक्सिजन टँकर चालवण्यासाठी सरकारला ड्रायव्हर मिळेना,आता एसटी ड्रायव्हर चालवणार टँकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

