🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात दररोज वाढणारी रुग्ण संख्या आणि उपलब्ध बेडचे प्रमाण यात मोठ्या प्रमाणात तफावत तर आहेत शिवाय ऑक्सिजन बेडचे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे पालिकेने आता ऑक्सिजन बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच ५ ते ७ लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करणारे शंभर ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन सीएसआरमधून पालिकेला देण्याची मागणी केली जाणार असल्याचे पालिका अधिकार्यांनी सांगितले.
कोरोनाच्या या दुसर्या लाटेत शहरातील प्रत्येक वसाहतीत अधिक प्रमाणात संसर्ग वाढत चालल्यामुळे कुटुंब बाधित होत आहे. यातील बहुतांश बाधित रुग्ण हे पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये दिडशे बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे.
त्यासोबतच पालिकेकडे ८५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध आहेत. हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विविध कोविड सेटरमध्ये बसवलेले आहेत. कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्यास ऑक्सिजन कॉन्संट्रेटर लावून त्यास ऑक्सिजन पुरविला जातो.
इतर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना तातडीने ऑक्सिजनची गरज भासली तर ऑक्सिजन कॉन्संट्रेटरव्दारे गरज भागवली जाऊ शकते. हवेतून ऑक्सिजन तयार करुन ऑक्सिजन कॉन्संट्रेटरव्दारे रुग्णांना पुरवठा केला जाऊ शकतो. साधारणपणे ५ ते ७ लिटर ऑक्सीजन लागणार्या रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर हे मशीन अत्यंत उपयुक्त आहे.
ऑक्सिजनची तातडीने गरज भागविली जाणार असल्याने रुग्णांसह नातेवाईकांची होणारी धावपळ थांबणार आहे.कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शंभर मशीन घेण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाचा मानस असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय पथकाच्या सूचनांना मनपाने टांगले ‘हॉटस्पॉट’च्या वेशीवर !
- कोरोनातून सावरताच दिपीका-रणविरच्या पावलावर पाउल टाकत आलिया-रणबीर निघाले मालदीवला
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’
- विकी- कतरिना एकाच वेळेस करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ; सर्वत्र रंगली प्रेमाची चर्चा
- कोरोना अलर्ट! उस्मानाबादेत मृत्यूदर सर्वाधिक, पॉझिटिव्हिटी रेट ही वाढला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

